१९८० साला पासुन भाजप चे संघटनात्मक काम करणारेभाजपा चे प्रमुख प्रवक्ते मा. माधव भंडारी यांची उपेक्षाच....
राजकारणात मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हाती मिळते ती फक्त उपेक्षाच याचे उत्तम उदाहरण म्हणजे भंडारी साहेब..यांना आपण सर्वजण ओळखतो ते म्हणजे टीव्ही चॅनल च्या माध्यमातून.प्रमाणिक पणे काम करून पक्षाची सातत्याने बाजू मांडण्याचे काम भंडारींनी केले.पक्ष अडचणीत आला की आहेतच भंडारी,कोणी तोंड सोडून स्वतःचा बलिशपणा दाखवला की आहेत भंडारी सारवासारव करायला. अतिशय अभ्यासू वेक्तीमहत्व म्हणून प्रसिद्ध ..पण राजकारणात अभ्यासू असून चालत नाही तर चाकरी करणारे हवे असतात. पैसा फेकणारे असावे लागते. कोणा बद्दल वाईट बोलायला नाही पाहिजे. फक्त हात जोडता आले की तोच कार्यकर्ता पण खरे बोलले की फुटीरवादी असच समजले जाते. साहेब सत्तेत आहेत की विरोधी पक्षात हे ज्यांना अजून कळत नाही त्यांच्या विरोधाला बळी पडले भंडारी....सत्तेसाठी लाचार ,झालेल्यासाठी अनेक हुशार वेक्तीमहत्व आज विधानसभा ,विधानपरिषदे पासून लांब आहेत. एवढे मोठे महाराष्टाचे दुर्दैव आहे.सत्तेसाठी काय पण असाच बाणा असतो तो याही निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येतंय. फक्त एक उमेदवारी साठी रात्रीपासून ते सकाळ पर्यंत दिर्घ चर्चा होते पण तेच जनतेच्या प्रश्नांसाठी कुठे रात्रभर चर्चा झाल्याचे ऐकवत नाही. असो आपण सामन्य आहोत.. फक्त मतदान करायचे आणि शांत बसायचे एवढेच सध्या मतदार राजाला काम. .कारण या निवडणुकीत आपण निडवडून दिलेले उमेदवार मतदान करणार आहेत. ते ही स्वतःचा मनानुसार नाही तर वरिष्ठ सांगतील त्या प्रमाणे.... असो अशी ही आपली निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही...........
- अमोल अवचिते

