Friday, 5 January 2018

माधव भंडारी

       
          १९८० साला पासुन भाजप चे संघटनात्मक काम करणारेभाजपा चे प्रमुख प्रवक्ते मा. माधव भंडारी  यांची उपेक्षाच....
राजकारणात मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हाती मिळते ती फक्त उपेक्षाच याचे उत्तम उदाहरण म्हणजे भंडारी साहेब..यांना आपण सर्वजण ओळखतो ते म्हणजे टीव्ही चॅनल च्या माध्यमातून.प्रमाणिक पणे काम करून पक्षाची सातत्याने बाजू मांडण्याचे काम भंडारींनी केले.पक्ष अडचणीत आला की आहेतच भंडारी,कोणी तोंड सोडून स्वतःचा बलिशपणा दाखवला की आहेत भंडारी सारवासारव करायला. अतिशय अभ्यासू वेक्तीमहत्व म्हणून प्रसिद्ध ..पण राजकारणात अभ्यासू असून चालत नाही तर चाकरी करणारे हवे असतात. पैसा फेकणारे असावे लागते. कोणा बद्दल वाईट बोलायला नाही पाहिजे. फक्त हात जोडता आले की तोच कार्यकर्ता पण खरे बोलले की फुटीरवादी असच समजले जाते.  साहेब सत्तेत आहेत की विरोधी पक्षात  हे ज्यांना अजून कळत नाही त्यांच्या विरोधाला बळी पडले भंडारी....सत्तेसाठी लाचार ,झालेल्यासाठी अनेक हुशार वेक्तीमहत्व आज विधानसभा ,विधानपरिषदे पासून लांब आहेत. एवढे मोठे महाराष्टाचे दुर्दैव आहे.सत्तेसाठी काय पण असाच बाणा असतो तो याही निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येतंय. फक्त एक उमेदवारी साठी रात्रीपासून ते सकाळ पर्यंत दिर्घ चर्चा होते पण तेच जनतेच्या प्रश्नांसाठी कुठे रात्रभर चर्चा झाल्याचे ऐकवत नाही. असो आपण सामन्य आहोत.. फक्त मतदान करायचे आणि शांत बसायचे एवढेच सध्या मतदार राजाला काम. .कारण या निवडणुकीत आपण निडवडून दिलेले उमेदवार मतदान करणार आहेत. ते ही स्वतःचा मनानुसार नाही तर वरिष्ठ सांगतील त्या प्रमाणे.... असो अशी ही आपली निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही...........
                                                              - अमोल अवचिते

Monday, 1 January 2018

भीमा कोरेगाव

विजयस्तंभ (संग्रहीत फोटो)
      भीमा कोरेगाव  येथील झालेल्या दंगलीची बातमी वाचून धक्काच बसला आहे.........खरंच का हा शाहू,फुले,आंबेडरकरांचा महाराष्ट्र आहे..? शिवरायांच्या विचारांचा व त्यांनी घालून दिलेल्या तत्वांचा आहे???कोणताही धर्म असो की जात याचा आदर तो झालाच पाहिजे असे महाराज म्हणत.
        विजयस्तंभ हा लढाईत वीरमरण आलेल्या शुर सैनिकांचा आहे..सैनिकाला कधी कोणती जात ना धर्म असतो .परंतु आपल्या देशाच्या समाजव्यवस्थे  नुसार जाती धर्म आपण पाळतो त्याचे जातन करतो ..अभिमान बाळगतो..त्यानुसारच आपल्या जातीतील सैनिकाने जो काही पराक्रम केला होता त्याचा अभिमान असणारच ..न तो असायला ही हवा...पण काही समाज कंठकांनी एकत्र येऊन ऐतिहासिक असलेल्या जागेवर जावून लाजिरवाणे कृत्य केले.त्याचा निषेध तर झालाच पाहिजे.....अरे समाज विघटकांनो तुम्ही तुमच्या विचारांची आज पातळी दाखवली आहे....आज जी घटना घडली ती लोकशाहीला धक्का देणारी ठरली ..दंगल घडवून आणून तुम्ही जी अराजकता माजवू पाहताय त्याचा काही उपयोग होणार नाही ....तोडा आणि फोडा ही नीती अवलंबुन इंग्रजांनी भारतावर १५० वर्ष राज्य केले..तरी सुद्धा अजून अक्कल येत नाही काय.??
       किती बी लावा युक्ती आहे भिमाच्या राज्यघटनेत शक्ती .....आपली लोकशाही इतकीही कमकुवत नाही की चार दोन संजकंठकांमुळे लुळीपांगळी होईल....समाजामध्ये कोणतेही दरी निर्माण आपण करू शकणार नाहीत न आम्ही समाज म्हणून पडू देणार नाही...
  जय हिंद!.....भारत माता की जय......जय भीम ...जय शिवराय.....
                                                               

                                                                 अमोल अवचिते

Sunday, 31 December 2017

नवे वर्ष अपेक्षांचे की जबाबदारीचे.....??

         

           "काळ कधीही कोणासाठी थांबत नसतो....तो एकतर आपल्या पुढे , नाहीतर सोबत असतो...". आज वर्षाचा शेवटचा दिवस, त्यामुळे प्रत्येक जण हा गतवर्षाचा आढावा घेण्याचा काही तरी प्रयत्न करणाच व पुढील वर्षाच्या इच्छा/अपेक्षा काय असणार याच एक गणित तयार करणार.  म्हणजे आपण एक विचार करू की एखाद्या स्त्रीला दिवस गेले की ,घरामधील प्रत्येक व्यक्तीला आनंद होतोच. तिच्या गर्भात निर्माण झालेला गर्भ हा मुलांचा असला पाहिजे अशी मानसिकता साहजिकच असते. कोणाला मुलगी हवी असते तर कोणाला मुलगा. जो नैसर्गिकरित्या गर्भ निर्माण झालाय त्याला न  भावना ,न संवेदना. मात्र त्याच्या कडून अपेक्षा की बाहेर येताना मुलगाच होऊन ये ..किंवा मुलगीच होऊन ये...
  खरंच आपले आयुष्य हे पण, नव्याने या जगात प्रवेश करत असतानाच लोकांच्या अपेक्षांनीच  निर्माण झालेले असते. आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस कोणाच्या ना कोणाच्या अपेक्षावर चाललेले असते. रोज नविन येणारा दिवस कोणाच्या तरी मर्जीनेच जगायचा की  स्वतःच्या इच्छेने ,आनंदाने?? 

              येणार नवं वर्ष हे इंग्रजी का असेना पण आपण त्याच्या स्वागताला सज्ज झालो आहोत. नवी  ध्येय ,नवी दिशा,नवी आकांक्षा,नवा उत्साह,नवा उपक्रम आणि नवा निश्चय हे सर्व घेऊन आपण नव्याने नव्या वर्षात प्रवेश करतोय....  येणार प्रत्येक दिवस आनंदानेच जगणार आहोत. नव्या वर्षाचा नवा दिवस आपल्यासाठीआनंदच घेऊन येणार आहे हे पक्क मनाशी ठरवून आपण त्या दिवसाला सामोरे जावूयात. रोजच काही तरी नवं शिकणार आहोत..नव्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. याच भान आपल्या हवंच .
  
         
      गेलेला प्रत्येक दिवस इतिहास जमा होतो.त्याच बरोबरीने भूतकाळात ही जमा होतोच. आता आपण नव्याने भविष्य काळाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. आता फक्त भूतकाळ हा आपला इतिहास केवळ आपल्या साठी अनुभव व एक धडा  म्हणून राहिला आहे, जो आयुष्यभरासाठी पुरणार आहे. नव्या आयुष्यात आपण भूतकाळाचा न भविष्याकाळाचा विचार करायचा , फक्त जगायचं ते वर्तमान काळातच, आपण हसतो ते फक्त आता, म्हणजे वर्तमान काळातच... २०१८ हे  येणारे नवे वर्ष आनंदाचे, चैतन्याचे, प्रेमाचे, भरभराटीचे व एक सुवर्ण संधीचे म्हणूनच राहील अशी अपेक्षा करुयात. सर्वांना नव वर्षांच्या मनापासून  हार्दिक शुभेच्छा!।।

                                                                                                                                                       


                                                                                                                           -अमोल अवचिते.

माधव भंडारी

                  १९८० साला पासुन भाजप चे संघटनात्मक काम करणारेभाजपा चे प्रमुख प्रवक्ते मा. माधव भंडारी  यांची उपेक्षाच.... राजकारणात म...